शिंदे गटाच्या आमदाराची जोरदार टीका : लोकांचे रक्त पिले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ सप्टेंबर २०२३ | राज्यातील शिंदे गटाचे आ.बांगर हे नेहमीच आपल्या विधानाने चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.

आ.संतोष बांगर म्हणाले कि, तुम्ही लोकांचे खूप रक्त पिले. आता हे रक्तही तुम्हाला कमी पडत आहे. 2024 च्या निवडणुकीत जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असे ते ठाकरे गटाच्या एका खासदारावर निशाणा साधताना म्हणालेत. संजय बांगर सोमवारी रात्री परभणी दौऱ्यावर आले होते. तिथे त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तुम्ही आमदार होण्यापूर्वी तुमची परिस्थिती काय होती आणि आता तुमची स्थिती काय आहे हे सर्वांना ठावूक आहे. तुम्ही अनेक तरुणांच्या खांद्यावर बंदुकी ठेवून स्वतःची पोळी भाजली, असे संजय बांगर यावेळी खासदार जाधव यांच्यावर टीका करताना म्हणाले. संतोष बांगर पुढे म्हणाले की, तुम्हाला लोकांचे रक्तही कमी पडले. एवढे रक्त तुम्ही पिले. एक लोकप्रतिनिधी असूनही तुम्ही जनतेला अश्लाघ्य शब्दांत शिवीगाळ करता. 2024 च्या निवडणुकीत येथील जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

उल्लेखनीय बाब म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या संपर्क अभियानात हिंगोलीत गेल्यानंतर बांगर यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे बांगर यांनी आता जाधव यांच्या जिल्ह्यात येवून आपल्यावरील टीकेची परतफेड केली आहे. आमदार संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वीच पोलिसांना भगव्या टोप्या देण्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्याचेही तीव्र पडसाद उमटले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यात आमची सत्ता आली तर सर्वांना भगव्या टोप्या देण्याचे विधान केले होते. त्यामुळे कदाचित मी मुख्यमंत्री झालो तर सर्वच पोलिसांना भगव्या टोप्या देईन, असते बांगर म्हणाले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम