दै. बातमीदार । २० जानेवारी २०२३ । राज्यातील अपघाताचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. रात्री खासगी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाच्या मृत्यू झाला. तर २० प्रवासी जखमी झाले. राज्यातील सर्वात वेगवान महामार्ग म्हणून ओळख असलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका सुरू आहेत.
नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणारी खासगी बस देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ उलटली. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
रात्री बस समृद्धी महामार्गावर मध्यभागी उलटली. त्यानंतर अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर निघून महामार्गाच्या बाजूला जात होते. प्रवासी रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना धडक दिली. यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर एक प्रवासी गंभीर जखमी आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम