जिल्ह्यात फौजदाराने घेतली १५ हजाराची लाच !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ ऑगस्ट २०२३ | गांजाची केस न करण्यासाठी तसेच जप्त दुचाकी सोडण्यासाठी 20 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 15 हजारांची लाच स्वीकारताना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार शिवाजी बाविस्कर यास जळगाव एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केली. चोपडा शहरातील बसस्थसानक परीसरात शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

शिरपूर तालुक्यातील जोयदा येथील ३२ वर्षीय तक्रारदार यांचे चुलत भाऊ व त्याच्या मित्रांना 23 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता तीन पोलिसांनी सत्रासेन रस्त्यावर दुचाकीवरून पकडले होते. पोलीस ठाण्यात चला, तुमच्यावर गांजाची कारवाई करायची आहे, अशी दमदाटी करून आम्हाला प्रत्येकी 75 हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत आरोपी पोलिसांनी तक्रारदाराच्या नातेवाईकांकडून पहाटेच्या सुमारास 30 हजार रुपये उकळले व तरुणांची दुचाकी ठेवून घेतली तसेच दुचाकी सोडवायची असेल तर 20 हजार रुपये लागतील, अशी मागणी 24 रोजी संशयित शिवाजी बाविस्कर केली व 15 हजार रुपये देण्यावर तडजोड करण्यात आली. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी 25 रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व लाच पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे 15 हजारांची लाच रक्कम आणल्यानंतर चोपडा शहरातील बसस्थानकाजवळ संशयित चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार शिवाजी बाविस्कर आल्यानंतर त्यास लाच दिली व पथकाला लाच दिल्याचा इशारा करताच पथकाने संशयितावर झडप घालून त्यास अटक केली. संशयिताविरोधात चोपडा शहर पोलिसात लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, दिनेशसिंग पाटील, बाळु मराठे, राकेश दुसाणे, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकुर, सचिन चाटे आदींच्या पथकाने यशस्वी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम