रामदेवबाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा; देसाई यांची मागणी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ नोव्हेबर २०२२ । रामदेव बाबा यांनी काल ठाणे येथील आयोजित केलेल्या योग शिबिरात महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळलीय. आज मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर सुमोटो अ‌ॅक्शन घेत महिला आयोग, सरकार आणि पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केली आहे. तर उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यावेळीच त्यांचा निषेध करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलीय.

तृप्ती देसाई म्हणाल्या की, योगगुरू रामदेव बाबा यांचे महिलांबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत लज्जास्पद आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, महिला साडी नेसली की छान दिसतात. ड्रेस घातला की छान दिसतात आणि त्यांच्या नजरेने पाहिले, तर महिलांनी काहीही घातले नाही, तरी त्या छान दिसतात. तुम्ही महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सुमोटो अ‌ॅक्शन घेऊन महिला आयोग, सरकारने आणि पोलिसांनी त्यांचावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.

तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, रामदेव बाबांबरोबर स्टेजवर जे लोक होते किंवा खाली जे लोक होते, अशा वक्तव्यानंतर ते हसतात. महिलांवर होणारे विनयभंग, बलात्कार यासारख्या ज्या घटना आहेत त्यानंतर मेणबत्त्या जाळणारे मोठ्या व्यक्तींना जेव्हा पाठिशी घालण्याचा प्रयत्न करतात. हे अत्यंत लाजीरवाणे आहे. मला रामदेव बाबांना सांगायचे आहे की, त्यांनी महिलांना लज्जा उत्पन्न होईल असेच वक्तव्य केले आहे. त्यामागे नेमके तुमचे काय कारण होते, तुम्हाला काय म्हणायचे होते, याचे स्पष्टीकरण जर नीट मिळाले नाही, तर तुमच्या कार्यक्रमात स्टेजवर येऊन मी जाब विचारणार असल्याचा इशारा दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम