जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करणार ; आजचे राशिभविष्य !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ ऑक्टोंबर २०२३

मेष : आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. सामाजिक, धर्मादाय कामावर लक्ष केंद्रीत कराल. आपल्या अडचणी प्रश्न घेऊन येणाऱ्यांना तुम्ही मदत कराल. जीवनसाथीला सरप्राईझ देऊ शकतात. तुमच्या कामाला आज दाद मिळेल.

वृषभ  : गुंतवणूक करण्याआधी योग्य सल्ला घ्यावा. तुमचे घरगुती कामकाज, जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. आजच्या दिवशी बाहेरचे भोजन तुमच्या पोटाची स्थिती खराब करू शकते. जोडीदारासोबत आनंदी क्षण घालवाल.

मिथुन  : संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन लाभेल. वेळ वाया घालवाल.

कर्क : नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता. घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. काही नवे मित्र जोडाल. तुम्ही आजचे काम उद्यावर ढकलत आहे तर, याचा तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाईट परिणाम भोगावा लागू शकतो.

सिंह : आर्थिक तणाव येईल. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरुन जाईल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. आपल्या योजनांना व्यावहारिक ठेवा आणि हवेत काही ही योजना बनवू नका.

कन्या : आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. सामाजिक, धर्मादाय कामावर लक्ष केंद्रीत कराल. आपल्या अडचणी प्रश्न घेऊन येणाऱ्यांना तुम्ही मदत कराल. आवडत्या कामात यशस्वी व्हाल. आपल्या भविष्याची योजना बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त दिवस. तुम्हाला चांगली बातमी समजणार आहे.

तूळ : खर्चांवर नियंत्रण ठेवा. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. घरात कुणी दूरच्या नातेवाइकांचे आगमन होऊ शकते. जोडीदारासमवेत रोमँटिक वातावरणाचा दिवसभर आनंद लुटाल.

वृश्चिक : आर्थिक लाभ होईल. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. एक उत्तम रेस्टोरंट मध्ये तुम्ही मित्र किंवा कुटुंबासोबत भोजन करण्याची योजना बनवू शकतात.

धनु : मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल. सासरच्या पक्षाकडून धन लाभ होण्याची शक्यता. वेळेची किंमत समजा. जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. तुमच्या गोष्टी आज तुमच्या जवळच्यांना समजणार नाही त्यामुळे तुम्हाला चिंता वाटेल.

मकर : मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. जोडीदार आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभी राहील.

कुंभ : आजचा दिवस अत्यंत महान आहे. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल. आई-वडिलांना न सांगता तुम्ही त्यांची आवडती डिश आज घरी आणू शकतात यामुळे घरात सकारात्मक वातावरण बनेल. निवांत वेळ घालवाल.

मीन : काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. रिकाम्या वेळचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमँटिक डेटवर घेऊन गेलात तर तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम