अखेर पालघर साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ ऑक्टोबर २०२२ ।  २०२० मध्ये पालघर येथे घडलेल्या साधू हत्याकांडाचा तपास आज नुकताच सीबीआयकडे देण्यास शिंदे-फडणवीस सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता यापुढे सीबीआय या प्रकरणाचा तपास करेल. महाराष्ट्र सरकारने एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यात म्हटले आहे की, 2020 मध्ये पालघर येथे घडलेल्या साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास महाराष्ट्र सरकार तयार आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारचा कोणताही आक्षेप नाही.

पालघरच्या गडचिंचले गावात 2 वर्षांपूर्वी जमावाने दोन साधूंची ठेचून हत्या केली होती. मुले पळवण्याच्या संशयावरुन जमावाने साधूंची हत्या केल्याचे नंतर समोर आले होते. महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या सीआयडीकडे (CID) या प्रकरणाता तपास सोपवला होता. मात्र, भाजपने मविआ सरकारच्या तपासावर विश्वास नसल्याचे सांगत या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणा सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. राज्यात सत्ताबदल होताच आता शिंदे-फडणवीस सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास प्रतिज्ञापत्राद्वारे मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग केला जाणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम