दिवाळीसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्याचे नियोजन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ ऑक्टोबर २०२२ ।  दिवाळीचा सन काही दिवसावर येवून ठेपल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून दिवाळीसाठी चार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दरम्यानच्या काळातील गर्दी बघता, गाड्यांमध्ये अधिक वाढ करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

दिवाळी उत्सव पंधरा दिवसावर आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येणार. दिवाळीला शाळा, महाविद्यालयाला सुट्ट्या असतात. यामुळे दिवाळीच्या वेळी कामानिमित्त अन्यत्र राहणारे कुटूंब उत्सवासाठी घरी जातात. सुट्ट्यांमध्ये दिवाळीनंतर नातेवाईकांच्या भेटीसाठी, पर्यंटनासाठी नागरिक बाहेर पडतात. प्रवासासाठी नागरिकांची प्राथमिकता रेल्वेला असते. यामुळे दरम्यानच्या काळात रेल्वेवर प्रचंड गर्दी वाढते. हिच बाब लक्षात घेऊन 22 ऑक्टोबरपासून दिवाळीसाठी चार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.
अमरावती – जबलपुर दरम्यान नुकतेच गाडीला सुरुवात झाली आहे. गाडी क्रमांक 12160 जबलपुर – नागपूर हि गाडी आता अमरावती स्टेशनपर्यंत व गाडी क्रमांक 12159 अमरावती – जबलपूर स्टेशन दरम्यान धावेल. सध्या दुरुस्तीच्या कामासाठी अनेक गाड्या बंद आहेत. त्यामुळे ही गाडी सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या दिलासा आहे.

मुंबई ते रिवा दरम्यान धावणाऱ्या फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनचा कालावधी 02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – 28 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आले आहे. तर 02187 रिवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल 27 ऑक्टोबरपर्यंत धावेल. या गाड्यांच्या धावण्याचे दिवस, वेळा, थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

उत्सव काळात वाढविण्यात आलेल्या ट्रेनच्या तुलनेत प्रवाशांची गर्दी प्रचंड असते. चार गाड्यांना ही गर्दी झेपणारी नाही. त्यामुळे दिवाळी पूर्वी आणि परतीच्या प्रवासासाठी पुन्हा गाड्या वाढविण्यात याव्या. तसेच सुरू असलेल्या गाड्यांना अतिरिक्त कोच लावण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम