
फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप यांनी निभावली पोलीस बांधवांप्रती बहिणीची भूमिका
अमळनेर(आबिद शेख )सदरक्षणाय खल निग्रहणाय या वाक्याप्रमाणे वर्षभर आपल्या फेला संरक्षण देण्यासाठी दिवसरात्र एक करून नागरिकांना विविध सण उत्सव आनंदात साजरा करता यावेत यासाठी आपल्या कुटुंबाबरोबर न राहता आपल्या संरक्षणासाठी सदैव तत्पर व कटिबद्ध असणाऱ्या पोलीस बांधवांचे आपल्या सामाजिक जीवनात फार मोलाचे योगदान असते म्हणूनच अंमळनेर येथील फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप गेल्या अनेक वर्षापासून अंमळनेर पोलीस स्टेशनला रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करत असतात
सालाबादप्रमाणे यावर्षी ग्रुपच्या अध्यक्ष अड ललिता पाटील यांच्यासह ग्रुप सदस्य वसुंधरा लांडगे मॅडम डॉ. मंजुश्री जैन कोमल पारेख यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे साहेब आणि सर्व पोलीस बांधवांचे औक्षण करत राखी बांधली व रक्षाबंधनासारखा पवित्र सण पोलीस बांधवांसोबत साजरा केला.
यावेळी ग्रुपमधील बहिणींच्या मायेने पोलीस बांधव भारावून गेले व एक वेगळे आनंदाचे वातावरण बघायला मिळाले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम