स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे अमळनेर येथे आयोजन

बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिदशेख) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महसूल प्रशासनातर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमध्ये रोहित अशोक पाटील व मयूर जगन्नाथ पाटील हे संयुक्त रित्या प्रथम आले आहेत तर मुलींमध्ये प्रताप महाविद्यालयाची आरती गुलाब भिल प्रथम आली आहे.
१२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सानेगुरुजी शाळेच्या प्रांगणातून तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे ,गटविकास अधिकारी विशाल शिंदे , पोलीस निरीक्षक जयपाल हिरे , उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , संजय चौधरी , तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ ,पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे , पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ , पोलीस उपनिरीक्षक शिरोडे हजर होते.सानेगुरुजी शाळा ते धुळे रोड प्रवेशद्वार व परत तहसील कार्यालय अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
मुलांमध्ये द्वितीय जयेश संजय पाटील, तृतीय शुभम पाटील , चतुर्थ यश भिकन पाटील ,पाचवा कुणाल सुनील बोरसे तर मुलींमध्ये द्वितीय हशमा शेख इजाजोद्दीन ,तृतीय पूजा देविदास भिल , चतुर्थ त्रिष्णा मनोज वाघ ,पाचवी ममता देविदास पाटील यांनी विजय मिळवला आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुनील वाघ ,क्रीडा संघटना कार्याध्यक्ष संजय पाटील , प्रा सचिन पाटील , सचिन वाघ , शिक्षक आर जे पाटील, राहुल बहिरम ,के एस पवार ,विनोद पाटील , आर एस घुघे , सॅम शिंगाने ,गोकुळ बोरसे ,स्वप्नील पाटील ,पंकज पाटील ,कमलेश मोरे , हर्षदा सुर्यवशी ,पत्रकार समाधान मैराळे ,पत्रकार विजय गाढे , प्रिटेश तुरणकर, एन एल पाटील,एस वाय करंदीकर, माजी सैनिक धनराज पाटील ,राजेंद्र यादव, खान्देश रक्षक संघटना , तलाठी संघटना यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम