रोटरी गोल्डसिटीच्या क्रिकेट स्पर्धेत सावरिया स्टार परिवार विजयी

सामाजिक उपक्रमांच्या निधीसाठी आयोजन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० सप्टेंबर २०२२ । जळगाव येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे आयोजित चार दिवसीय रोटरी बॉक्स क्रिकेट स्पर्धेत सावरिया स्टार परिवाराने विजेते तर सिद्धी डिफेंडर्च या संघाने उपविजेते पद मिळविले.

सामाजिक उपक्रमांच्या मदत निधीसाठी टर्फ रॉयल मैदानावर साखळी पद्धतीने 26 टीमने 54 सामने खेळले. रोटरी परिवारातील 700 कुटुंबीयाचा यात सहभाग होता. प्रत्येक टीममध्ये 7 पुरुष व 3 महिला अशा दहा खेळाडूंचा समावेश होता.

यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुनील आडवाणी, मानद सचिव निखील चौधरी, आयोजन समिती प्रमुख निखील रेदासनी, प्रतिक शाह, राहूल कोटेचा, प्रसन्ना जैन, यश रावलानी, विनायक बाल्दी, मनिष पाटील, डाॅ. अर्चना कोतकर, डॉ. सिमरन जुनेजा, जयंतिका काबरा, विनोद जैन यांनी परिश्रम घेतले. शहरातील६ सर्व नऊ रोटरी क्लब, भुसावळ रेलसिटी आणि इनरव्हील क्लबचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम