‘भावी मुख्यमंत्री फडणवीस’ नागपुरात बॅनर झळकले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ एप्रिल २०२३ ।  राज्यात गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरु होती ती चर्चा आता थांबली असून आता नव्या चर्चेने राजकारणात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी वृत्तवाहिनीली मुलाखत देतांना नागपूरच्या बॅनर प्रकरणावर भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांना नागपूरमधील बॅनरवरुन विचारण्यात आलं. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, ज्या कोणी ते बॅनर लावले आहेत ते त्यांनी काढून टाकावेत. अतिउत्साही लोकं असतात, तेच असं करतात. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. २०२४ मध्ये तेच मुख्यमंत्री होतील. त्यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवू, असं फडणवीस म्हणाले.

कर्नाटक निवडणुकीच्या अनुषंगाने बोलतांना ते म्हणाले की, कर्नाटकमध्ये भाजपला बहुमत मिळेल. मोदींच्या कामामुळे कर्नाटकसह संपूर्ण देशात त्यांचा प्रभाव आहे. आपले मुख्यमंत्री मोदीजींसोबत काम करत आहेत, हे कर्नाटकच्या जनतेला चांगलं माहिती आहे. कर्नाटकात पु्न्हा डबल इंजिनचं सरकार काम करेल,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम