गांधी बेलवरच आहे कारवाई करून फायदा नाही ; उपमुख्यमंत्री फडणवीस !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ नोव्हेबर २०२२ वि. दा. सावरकरांवर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चांगलेच भोवत आहे. त्याच्यावर राज्यतील विविध नेत्याकडून टीका होत आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांच्यासारख्या व्यक्तींवर कारवाई करून काही फायदा नसतो. अनेक केसेस यापूर्वीदेखील ते भोगत आहेत. ते तसेही बेलवरच आहेत. अनेक वेळा कोर्टात हजर राहत नाही. म्हणून वारंट निघतात. ते खोटं बोलताहेत. त्याचं उत्तर मात्र आम्ही निश्चितपणे देऊ.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं, मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी अशी विधानं केली जात असावीत. सुरुवातीला मीडियाचं विशेष लक्ष नव्हतं. माध्यमात चर्चा व्हावी, यासाठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काही केलं तर ठिक आहे. पण, कायद्याच्या चौकटीबाहेर काही केलं तर त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल.

राहुल गांधी यांची यात्रा सुरू आहे. आम्ही सुरक्षा दिली आहे. सुरक्षितपणे आम्ही त्यांची यात्रा बाहेर काढू. पण, महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा इशारा फडणवीस यांनी दिला. रोज खोटं बोलायचं. काळ्यापाण्याची शिक्षा भोगली त्यांच्याबद्दल ज्यांनी जेलची पायरी पाहिली नाही, त्यांनी बोलावं. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळं राज्यात राहुल गांधी यांच्याबद्दलचा राग राज्यात आहे. दरवेळी राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन वाटेल तसं बोलतात. शिवसेनेचे नेते हे ते गेल्यावर काहीतरी एखादं वाक्य बोलतात. बाकी सत्तेकरिता त्यांच्यासोबत आहे. हे सावरकरांकरिता सत्ता कधीच सोडू शकत नाही, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम