हा अभिनेता करणार लवकरच राजकारणात प्रवेश !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ नोव्हेबर २०२२ सध्या राजकारणात विविध अभिनेते व अभिनेत्री प्रवेश करीत त्यांच्या आवडत्या नेत्यासोबत फोटो सुद्धा व्हायरल होत आहे. अशातच अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या झिम्मा चित्रपटाने धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘सनी’ हा त्याचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हेमंत एक संवेदनशील कलाकार आहे. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर कायमच भाष्य करत असतो. सध्या तो ‘सनी’ चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर महत्वाचे भाष्य केले आहे.

एका मुलाखतीत हेमंतला ”राजकारणात प्रवेश करणार का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी हेमंतने अत्यंत मोजक्या आणि मार्मिक शब्दात उत्तर दिले. हेमंत म्हणाला, ‘मला राजकारणात प्रवेश करायला नक्कीच आवडेल. तो माझ्या आवडीचा विषय आहे. पण सध्या वातावरण तसं नाही. मी हे सगळं प्रचंड फॉलो करत असतो. मला कोणतेही राजकीय प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं माझ्याकडे आहेत.

 

 

पण आता तसं वातावरण आजूबाजूला आहे असं मला वाटत नाही. सगळं काही खूप नकारात्मक आहे. जेव्हा तशी वेळ येईल तेव्हा मी नक्कीच विचार करेन,’ असे तो म्हणाला आहे. ‘आपण एकटे जाऊन सर्व यंत्रणेत बदल करु शकत नाही. मी आलो की सगळं साफ करुन टाकेन हे बोलायला आणि ऐकायला चित्रपटातील डायलॉगसारखं चांगलं वाटतं, पण तसं होत नाही. अनेक गोष्टी या ठरलेल्या असतात. त्यामुळे आता तरी मी हे करणार नाही.’

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम