समाजकंटकांचा पुण्यात धूडघूस : पार्किंगमधील वाहनांची जाळपोळ

बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ नोव्हेबर २०२३

राज्यातील पुणे शहरात दिवसेदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या सर्वत्र दिवाळीची धामधुम सुरू असतानाच पुण्यामध्ये पार्किंगमधील वाहनांची जाळपोळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात वाहनांची तोडफोड, जाळपोळ करत दहशत माजवण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वारजे भागातील रामनगर टाकी चौक परिसरात गुरूवारी १६, नोव्हेंबर मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास समाजकंटकांकडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या तीन दुचाकी पेटविण्यात आल्यात तर एका चारचाकी वाहनाची काच फोडून नुकसान करण्यात आले आहे. दुचाकीवरून आलेल्या 2 व्यक्तींनी हा प्रकार केला असावा अशी शक्यता नागरिकांकडून वर्तविली आहे. या घटनेवर योग्य कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली असून वारजे पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम