मॅट्रिमोनी वेबसाईटवर भेट : व्यापारी असल्याचे सांगितले अन १५ लाखात फसवणूक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ नोव्हेबर २०२३

जगभरातील अनेक तरुण तरुणी लग्नासाठी उत्तम वर वधू शोधण्यासाठी अनेक सोशल मिडीयावर वेबसाईटचा वापर करीत असतात मात्र यावर अनेक महिलांची फसवणूक होत असल्याचे नेहमीच दिसून येत असतांना अहमदाबाद येथून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. नुपूर मेहता या महिलेने याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर मॅट्रिमोनी वेबसाईटवर १५ महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदाबादमधून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. महिलेला आरोपीने तब्बल ७ लाखांचा गंडा घातला आहे. लग्नाचे आश्वासन देऊन तिला आरोपीने फसवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुपूर या महिलेने मॅट्रिमोनी साईटवर आपले प्रोफाईल तयार केले होते. १ नोव्हेंबर रोजी वैभव शाह (वय ३०) याने नुपूर यांना रिक्वेस्ट पाठवली होती. नुपूर या लग्नासाठी वराच्या शोधात असल्याने त्यांनी रिक्वेस्ट स्वीकारली.पुढच्या दिवशी शाह याने महिलेला लग्नाची मागणी घातली. शाहने तो हिरे व्यापारी असून दक्षिण आफ्रिका आणि मुंबईत त्याचा व्यवसाय असल्याचं सांगितलं होतं. शाहने महिलेला सांगितलं होतं की, तिने त्याच्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवावे. यामुळे तिला दोन दिवसांमध्ये दुप्पट पैसे मिळतील. हे पैसे लग्न धुमधडाक्यात करण्यासाठी कामाला येतील.

नुपूर यांनी शाहवर विश्वास ठेवला आणि त्याला ऑनलाईन ७ लाख रुपये पाठवले. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने आपले प्रोफाईल साईटवरुन डिलिट केले आहे. मोबाईल क्रमांक बंद करुन ठेवला. महिलेला कळालं की तिची फसवणूक झाली आहे. त्यानंतर नुपूर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ऑनलाईन ट्रान्सेक्शन आणि बँक खात्याच्या क्रमांकावरुन आरोपीचा पत्ता काढला. पोलिसांनी आरोपीला अहमदाबादमधून पकडल्यानंतर त्याने अनेक खुलासे केले आहे. आरोपीचे खरे नाव अनिल सोलंकी असून त्याचे वय ३७ आहे. तो अहमहाबादचा रहिवाशी आहे. याप्रकरणी सोलंकीच्या एका साथीरादाराला देखील अटक करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम