गौतमीचा कार्यक्रम म्हणजे गडबड अन गोंधळ ; पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ सप्टेंबर २०२३ राज्यात आपल्या डान्सच्या माध्यमातून अल्पावधीत तरुणासह वृद्धांच्या गळ्यातील ताईत झालेल्या गौतमी पाटील नेहमीच आपल्या डान्समुळे वेगवेळ्या शहरात चर्चेत येत असते. तिने आता तिच्या कार्यक्रमात जेव्हा गडबड, गोंधळ किंवा तत्सम जे प्रकार घडतात त्यावर भाष्य केलं आहे. गौतमी पाटीलने बारामती या ठिकाणी एक कार्यक्रम केला. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर तिला गडबड आणि गोंधळाविषयी विचारण्यात आलं तेव्हा गौतमी पाटीलने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बारामती तालुक्यातल्या झारगडवाडी या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे.

बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे पार्थ पवार युथ फाउंडेशन दहीहंडी उत्सवाला गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. मेखळी येथील भैरवनाथ दहीहंडी संघाने येथील दहीहंडी फोडली. झारगडवाडी येथील कार्यक्रमात अतिशय शिस्तबद्ध नियोजन असल्याने माझ्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ झाला नाही यामुळे आयोजकांचे नियोजन मला आवडले असल्याचे गौतमी पाटील हिने प्रसार माध्यमांना सांगितले.

“आज झालेल्या कार्यक्रमाचं नियोजन चांगलं होतं. कार्यक्रम खूप छान पार पडला. भांडण किंवा मारामारी आजच्या कार्यक्रमात काहीही घडलं नाही. मला नियोजन खूपच आवडलं. माझा कार्यक्रम म्हटलं की गडबड आणि गोंधळ, मारामारी असं होतं असंच सांगितलं जातं. मात्र माझ्या सगळ्याच कार्यक्रमात भांडण, मारामारी असे काही प्रकार होत नाहीत. पण काय होतं त्यावरुनच टार्गेट केलं जातं. मात्र माझ्या प्रत्येक कार्यक्रमात असं घडत नाही. याआधी जी बातमी समोर आली होती तो माझा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे तिथे तसं घडलं. मात्र प्रत्येक कार्यक्रमात असं घडत नाही.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम