महिलेला विविध हॉटेलात नेवून अत्याचार !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ सप्टेंबर २०२३ | भडगाव तालुक्यातील एका 36 वर्षीय महिलेला लग्नाचे खोटेआमिष दाखवून तिला जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २००८ ते १५ मे २०२३ पर्यंत रिजवान जैनउद्दीन शेख वय ४२, धंदा – ड्रायव्हर, रा. वाल्मिकनगर, मंगलकार्यालय जवळ, चाळीसगाव ता. चाळीसगाव . पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवुन वारंवार तिला विविध ठिकाणी यात सुधाशांती लाँज पाचोरा तसेच विलास लॉज जळगांव तसेच चाळीसगांव येथील लॉजचे नांव माहीत नाही आधी ठिकाणी शारीरीक संबंध निर्माण केले आहे. तसेच इमरान जैनउद्दीन शेख रा. वाल्मिकनगर, चाळीसगाव याने दि. १५ मे २०२३ रोजीळी फिर्यादी शुध्दीत नसतांना फिर्यादी सोबत पाचोरा येथील सुधा शांती लॉज येथे फिर्यादीचे संमतीशीवाय शारीरीक संबंध केले तसेच रिजवानचा भाऊ इमरान जैनउद्दीन शेख, मोहिद्दीन जैनउद्दीन शेख व रिजवानची बायको इशरतबी असे फिर्यादीस वारंवार अश्लील शिवीगाळ करुन पिढीतला जिवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे पीडित महिलेने घाबरून आरोपींविरुद्ध पोलिसात तक्रार दिली नव्हती. मात्र महिलेने अखेर पाचोरा पोलीस स्टेशनला धाव घेऊन रिजवान जैनउद्दीन शेख इमरान जैनउद्दीन शेख, मोहिद्दीन जैनउद्दीन शेख, रिजवानची बायको इशरतबी सर्व रा. यांच्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम