बातमीदार | १४ ऑगस्ट २०२३ | देशात गेल्या काही दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात चढ उतार निर्माण झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोने स्वस्त झाले आहे. यामुळे आता तुम्ही हजारो रुपयांची बचत करून तुमच्यासाठी सोने खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या आज बाजारात सोने त्याच्या उच्च पातळीच्या दरापेक्षा खूपच स्वस्त विकले जात आहे. मात्र येत्या काही दिवसात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो आज भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 58,900 रुपये, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) ची किंमत 53,960 रुपये नोंदवली गेली. या शहरांमधील सोन्याचे नवीनतम दर जाणून घ्या
देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,660 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 54,700 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 59,510 रुपये आहे, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 54,550 रुपये आहे. राष्ट्रीय राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 59,510 रुपये होता, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 54,700 रुपये होता. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 59,510 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 54,550 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम