संधी मिळाल्यास “या” शो मध्ये जाण्याचा पाटलांचा मानस

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० सप्टेंबर २०२२ । पाणीपुरवठा मंत्री व शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील हे कायम त्यांनी केलेल्या विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळीही त्यांनी “बिग बॉस” या टीव्ही रिएलिटी शो मध्ये जाण्याची सुवर्णसंधी मिळाल्यास नक्की भाग घेऊ, असा मानस व्यक्त केला.

याबाबत गुलाबराव पाटलांनी “बिग बॉस” मध्ये जाणार का? असा प्रश्न केला असता, त्यांनी “जर बिग बॉसमध्ये जाण्याची सुवर्णसंधी मिळाली तर मी निश्चितच जाईल. मागील काळात मी नेहमी नाटकांत भाग घ्यायचो. त्यामुळे यातही भाग घेऊ” असे मत व्यक्त केले आहे.

नुकत्याच एका कार्यक्रमात अभिनेते व सिनेदिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांना “बिग बॉस मराठी मध्ये कोणते राजकारणी चेहरे बघायला आवडतील?” असा प्रश्न केल्यावर त्यांनी अनेक राजकीय मान्यवरांची नावे घेतली. यात गुलाबराव पाटील यांचाही समावेश होता.

कडक बोलणारे राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी, उत्तम विनोदबुद्धीचे धनी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांच्यासह भाजप आमदार नितेश राणे, शिवसेना खासदार संजय राऊत यांना “बिग बॉस” मध्ये बघायला आवडेल, असेही महेश मांजरेकर म्हणाले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम