“या” दिवशी आहे भव्य सेल; भरघोस सूट मिळण्याची शक्यता

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० सप्टेंबर २०२२ । ह्या सणासुदीच्या काळात जर तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी करून घरी आणणार असाल, तर आताच थांबा, ही बातमी वाचून तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही.

कारण येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फ्लिपकार्टचा “बिग दिवाली सेल” सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. “शॉपिंग का बडा धमाका” असे या सेलची टॅगलाईन असल्याने, यावेळी फ्लिपकार्ट विविध उत्पादनांवर भरघोस सूट व सवलत देणार असल्याचे संकेत आहे.

फ्लिपकार्टने ह्या आगामी सेल इव्हेंटचा टिझर ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करून कालांतराने हटवून टाकला. दरम्यान याचवेळी काही जणांनी या टिझरचा स्क्रीनशॉट काढून विविध सोशल मीडिया माध्यमातून प्रसारित केला.

हा सेल ५ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, फ्लिपकार्ट प्लस ग्राहकांना याचा “अर्ली एक्सेस” मिळेल. तसेच आज “बिग बिलियन डे” सेलचा अखेरचा दिवस आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम