माता अमृत-मदर मिल्क बँकेच्या कार्यात स्त्रीरोग, बालरोग तज्ञ देणार योगदान

जनजागृती भित्तीपत्रकाचे अनावरण

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०७ ऑगस्ट २०२२ । जळगाव येथील रोटरी जळगाव वेस्ट आणि जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मती सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पीटलमध्ये संचालित असलेल्या माता अमृत (आईचे दूध)मदर मिल्क बँकेच्या कार्यात सर्व स्त्रीरोग व बालरोगतज्ञ डॉक्टर्स जनजागृती करुन योगदान देणार असल्याची ग्वाही नुकत्याच आयोजित कार्यक्रमात देण्यात आली.

शाहू महाराज हॉस्पीटल येथे शुक्रवार दि. ५ रोजी मदर मिल्क बँकेच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी बालरोगतज्ञ व रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, माजी सहप्रांतपाल डॉ. राजेश पाटील, बालरोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय बाविस्कर, डॉ. अविनाश भोसले, डाॅ. गौरव पाटील, स्त्रीरोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. सीमा पाटील, डॉ. दिप्ती पायघन, डॉ. शितल भोसले, डॉ. प्रिती दोशी, डॉ. निलीमा बोरोले, रोटरी वेस्टचे अध्यक्ष सुनील सुखवाणी, मानद सचिव विवेक काबरा, माता अमृत मदर मिल्क बँकेच्या चेअरपर्सन संगीता पाटील, डिस्ट्रिक्ट जाँईट सेक्रेटरी योगेश भोळे, डॉ. आनंद दशपुत्रे, बिपीन काबरा, निखील बियाणी, रिंकल कोठारी आदि मान्यवरांसह शाहू महाराज हॉस्पिटलचे डॉक्टर्स, तंत्रज्ञ व सहकाऱ्यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम