जिल्हा ब्राह्मण महासंघातर्फे ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०६ ऑगस्ट २०२२ । जळगाव येथील जळगाव जिल्हा ब्राह्मण महासंघातर्फे शहरातील १० वी १२ वी च्या परीक्षेतील ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

प्रभात कॉलनी चौकातील शानबाग सभागृहात शनिवारी दि. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी आयोजित या सोहळ्यास व्यासपीठावर प्रमुख अतिथी डॉ. जयंत जहागीरदार, अध्यक्ष व्ही पी कुलकर्णी, कार्याध्यक्ष निलेश कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख अजय डोहोळे, सचिव प्रा. शैलेश कुलकर्णी, महिला आघाडी प्रमुख हेमलता कुलकर्णी या मान्यवरांची उपस्थिती होती.

या प्रसंगी डॉ. जयंत जहागीरदार यांनी मार्गदर्शन केले तर व्ही. पी. कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले, निलेश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रास्ताविकात प्रकल्प प्रमुख अजय डोहोळे यांनी महासंघातर्फे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून आज शहरातील १२ विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व इतर सर्व विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आल्याची माहिती दिली.

सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी तर आभार हेमलता कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमास समाजातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम