राष्ट्रवादीच्या चिन्हावर आज होणार सुनावणी !
बातमीदार | ९ नोव्हेबर २०२३
राज्यातील दोन मोठ्या पक्षांच्या फुटीनंतर हा वाद आता न्यायालायात सुरु आहे तर यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हावर शरद पवार आणि अजित पवार यांच्या दाव्याबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी मागील सुनावणी झाली होती. त्यावेळी अजित गटाच्या वतीने निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या 9000 हून अधिक कागदपत्रांमध्ये अनियमितता आढळल्याचा दावा शरद गटाने केला होता.
शरद पवार यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी निवडणूक आयोगासमोर हजर झाले. 6 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाने केलेल्या दाव्यांवर निवडणूक आयोगाने शरद गटाला 30 ऑक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. वास्तविक, अजित पवार यांनी दावा केला होता की, त्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 42 आमदारांचा, 9 पैकी 6 आमदारांचा, नागालँडमधील सर्व 7 आमदारांचा आणि राज्यसभा आणि लोकसभेतील प्रत्येकी एका सदस्याचा पाठिंबा आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा करत 30 जून रोजी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम