हरियाणात हिसांचार ; इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ ऑगस्ट २०२३ | देशात गेल्या काही महिन्यापासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिसांचार सुरु असतांना त्यापाठोपाठ आता हरियानात देखील गेल्या पाच दिवसापासून हिंसाचार सुरु असून आता या राज्यातील 4 जिल्ह्यांतील परिस्थिती तणावपूर्ण आहे. नूह, पलवल, फरिदाबाद आणि गुरुग्रामच्या सोहना, मानेसर आणि पाटोडीमध्ये 5 ऑगस्टपर्यंत इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे. या 4 जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दलाच्या वीस कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. नूहमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी, हरियाणा सरकारने द्वितीय भारतीय राखीव बटालियन (IRB) चे मुख्यालय नूह जिल्ह्यात हलवले आहे. या बटालियनमध्ये एक हजार सैनिक आहेत.

हरियाणा हिंसाचारावर अमेरिकेनेही वक्तव्य केले आहे. स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले – आम्ही सर्व पक्षांना हिंसाचारापासून दूर राहण्याचे आणि शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करतो. बुधवारी नूहमध्ये 2 तासांसाठी कर्फ्यू शिथिल करण्यात आला. परिस्थिती पाहून आज कर्फ्यू शिथिल करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. बुधवारी नूहमध्ये 2 तासांसाठी कर्फ्यू शिथिल करण्यात आला. परिस्थिती पाहून आज कर्फ्यू शिथिल करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. या हिंसाचारात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन होमगार्ड गुरसेवक आणि नीरज, नूहचे शक्ती, पानिपतचे अभिषेक, गुरुग्रामचे इमाम आणि बादशाहपूरचे प्रदीप शर्मा यांचा समावेश आहे. राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू आहे. बुधवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक हिंसाचार झाला.

राज्यात पोलिसांनी एकूण 68 गुन्हे दाखल केले आहेत. 166 जणांना अटक करण्यात आली असून 96 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नूहमध्ये 41, गुरुग्राममध्ये 18 आणि पलवलमध्ये 9 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. नूह येथे 116 आणि गुरुग्राममध्ये 50 जणांना अटक करण्यात आली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले – ना पोलीस, ना लष्कर, ना समाज प्रत्येक व्यक्तीचे रक्षण करू शकत नाही. सुरक्षिततेसाठी वातावरण तयार करावे लागेल. हिंसाचारात झालेल्या नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडूनच केली जाईल. केंद्र सरकारकडून निमलष्करी दलाच्या आणखी 4 तुकड्यांची मागणी करण्यात आली आहे. सीएम खट्टर म्हणाले की, कोणताही आयोग किंवा एसआयटी स्थापन करण्याची गरज नाही. दुसरीकडे, बुधवारी हरियाणाचे डीजीपी पीके अग्रवाल म्हणाले की, मोनू मानेसरच्या व्हिडिओसह हिंसाचाराशी संबंधित प्रत्येक तथ्याची चौकशी केली जाईल. यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून प्रत्येक पथकाला 7 ते 8 प्रकरणे तपासासाठी देण्यात येणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम