
महानोरांचे भाषण माणसाच्या काळजाचा ठाव घेत ; पवारांची भावनिक पोस्ट !
बातमीदार | ३ ऑगस्ट २०२३ | राज्यातील मोठे साहित्यिक आणि कवी असलेले व जळगाव जिल्ह्याशी जवळचे नाते असलेले कवी ना. धों. महानोर यांचे आज दि.३ रोजी सकाळी निधन झाल्यानंतर राज्यातील अनेक कवी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळींनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे.
माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे… pic.twitter.com/SF42UsISfp
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 3, 2023
पवार म्हणतात, “माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झालं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ना. धों. याचं बालपण कष्टात गेलं पण कष्ट झेलताना त्यांचं संवेदनशील मन रानात रमलं. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना. धो. यांच्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केलं. ना. धों. ची विधान परिषदेतील भाषणं देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत असतं. ते खूपच हळवे होते, पत्नीच्या निधनानं ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चं निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटुंबियांतर्फे या मृदू मनाच्या निसर्गकवीला श्रद्धांजली अर्पण करतो”

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम