नितीन देसाई रिपोर्ट आला समोर ; स्टुडिओमध्ये होणार अंत्यसंस्कार !
बातमीदार | ३ ऑगस्ट २०२३ | २ रोजी पहाटेच्या सुमारास बॉलिवूड क्षेत्रात हळहळनारी बातमी समोर आल्यानंतर अनेकांच्या पाया खालची जमीन सरकली होती. ती म्हणजे बॉलिवूड कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते.प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देसाई यांचा फाशीमुळे मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली आहे. नितीन देसाई यांचे बुधवारी 4 डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले. प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण फाशी असल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. तत्पूर्वी खालापूर पोलिसांनी नितीन देसाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात आणला होता. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील स्टुडिओमध्ये ते मृतावस्थेत आढळले.
रायगडचे एसपी सोमनाथ घार्गे यांनी बुधवारी रात्री माहिती दिली की, नितीन देसाई यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांचा अंत्यसंस्कार एनडी स्टुडिओमध्ये होणार आहे. स्टुडिओमध्ये सापडलेले साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्या केअरटेकर आणि ड्रायव्हरचे जबाबही घेतले आहेत.
नितीन देसाई यांचे पार्थिव बुधवारी संध्याकाळी एनडी स्टुडिओतून मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आले. नितीन देसाई यांचे पार्थिव बुधवारी संध्याकाळी एनडी स्टुडिओतून मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी सांगितले- सकाळी 9 वाजता मृतदेह दोरीला लटकलेला आढळला नितीन देसाई यांचा मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत सकाळी नऊच्या सुमारास आढळून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच श्वान पथक तेथे पोहोचले. प्रत्येक अँगलमधून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांना नितीन यांच्या मोबाइलमधून एक ऑडिओ क्लिप मिळाली असून त्यात 4 जणांचा उल्लेख आहे. त्यांच्या दबावाखाली नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. लवकरच त्यांचा जबाब नोंदवला जाईल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम