देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसे करावे ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ सप्टेंबर २०२२ । देवीच्या उपासनेतील ‘कुंकुमार्चन’ हा एक विशेष उपासनाप्रकार होय. देवीचा नामजप करत एकेक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून वहायला आरंभ करून देवीच्या डोक्यापर्यंत वहात येणे अथवा देवीला कुंकवाने स्नान घालणे म्हणजे ‘कुंकुमार्चन’. कुंकू हे शक्तीरूपी आहे, म्हणजेच कुंकवामध्ये देवीतत्त्व ग्रहण करण्याची क्षमता अधिक आहे. याच कारणाने देवीला ‘कुंकुमार्चन’ केल्यावर देवीच्या मूर्तीतील शक्तीतत्त्व कुंकवामध्ये येते. नंतर ते कुंकू आपण आपल्याला लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते.

देवीला कुंकुमार्चन करण्याच्या दोन पद्धती पाहूया.

1. पद्धती

अ. पद्धत 1

‘देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे. काही ठिकाणी कुंकुमार्चनात कुंकू केवळ चरणांवर वाहतात.’

आ. पद्धत 2

काही ठिकाणी देवीला कुंकुमार्चन करतांना कुंकू केवळ चरणांवर वाहिले जाते.

2. शास्त्र

‘मूळ कार्यरत शक्‍तीतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्‍तीतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणार्‍या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्‍तीतत्त्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणार्‍या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्‍तीतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणार्‍या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.

कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्तीतत्त्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम