
हजारो विद्यार्थि व नागरिकांच्या उत्सुर्त सहभागाने अमळनेर शहर तिरांगामय –१५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थि व नागरिकांनी सामूहिक पर्यावरणाची शपत घेतली
अमळनेर(आबिद शेख ) अमळनेर शहरातील नागरिकांनी व विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ९ अगस्त क्रांती दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चोपडा रोडावरील हजरत बालेमिया दर्गा समोरील तिरंगा चौकात हजारोंच्या संख्येने शहरातील सर्व समाजातील नागरिक विद्यार्थी उपस्थित होते
तिरंगा चौकात सकाळी १० वाजेपासून सर्व उपस्थित झाले होते यावेळी माजी सैनिकांनी ३०१ फुटाचे तिरंगा पथसंचलन करत आणून तिरंगा चौकात चारी बाजूंनी सावरला तसेच चारही दिशेने साने गुरुजी हायस्कूल,रायल हायस्कूल, ग्लोबल स्कूल , डी आर कन्या शाळा ,आर्मी स्कूल , लोकमान्य शाळा ,जी एस हायस्कूल , सर्व उर्दू शाळा, अल फैज हायस्कूल , कन्या ,प्राथमिक व माध्यमिक शाळा , प्रताप कॉलेज , समाज कार्य महाविद्यालय , पी बी ए इंग्लिश स्कूल , स्वामी विवेकानंद ,एन टी मुंदडा माध्यमिक विद्यालय , न्यू व्हिजन स्कूल , शिवाजी हायस्कूल , धंनदाई महाविद्यालय , जययोगेश्वर माध्यमिक विद्यालय , गायकवाड हायस्कूल,गांधलीपुरा प्राथमिक शाळा सह शहरातील सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथ संचलन करत तिरंगा चौकात जमले. देशभक्तीची गीते वाजवली जात होती , रांगोळ्यांनी तिरंगा चौक सजला होता. खान्देश सुरक्षा रक्षक व एनसीसी ,स्काऊट ,गाईड , एन एस एस ,पोलीस , होमगार्ड ,व शिक्षक राष्ट्रीय गणवेशात हजर होते. ९ ऑगस्ट रोजी सकाळी११वाजता सामूहिक राष्ट्रगीत होणार होते. मात्र साडे दहा वाजता शासनाचा संदेश आल्याने राष्ट्रगीत म्हणण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मात्र तरीही अमळनेर करांनी सामूहिक पर्यावरणाची शपथ घेऊन नवा इतिहास घडवला. संजय चौधरी यांनी पर्यावरणाची शपथ दिली. संजय पाटील सर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला होता. अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन व रांगोळीकार नितीन भदाणे,पालिकेचे सफाई कर्मचारी ,तलाठी यांचे सहकार्य लाभले.
या राष्ट्रीय सोहळ्यास आमदार अनिल पाटील , माजी आमदार स्मिता वाघ ,माजी आमदार डॉ बी एस पाटील , माजी आमदार शिरीष चौधरी , जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील , जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित ,प्रांताधिकारी सीमा अहिरे ,माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील , माजी नगराध्यक्ष विनोद पाटील ,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी , तहसीलदार मिलिंद वाघ , मुख्यधिकारी प्रशांत सरोदे , पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,नायब तहसीलदार नवनाथ लांडगे , उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , गटविकास अधिकारी विशाल शिंदे ,सहा गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी , गटशिक्षणाधिकारी एस पी चव्हाण , कर्नल प्रवीण धिमान ,तालुका क्रीडा अधिकारी सुजाता गुलाने ,प्राचार्य पी आर शिरोडे , ऍड ललिता पाटील ,प्रकाश मुंदडा , योगेश मुंदडा ,बजरंग अग्रवाल ,शीतल देशमुख , मुस्लिम समाजातील विविध शेत्रातील पदाधिकारी,
, सचिन पाटील ,सुरेश पाटील , व पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे , पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ , आरोग्य निरीक्षक हैबत पाटील ,संतोष बिऱ्हाडे यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर पत्रकार,उपस्थित होते

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम