अफझलखानांना मी भीत नाही, माझ्यावर आई भवानीचा आशीर्वाद : ठाकरे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ सप्टेंबर २०२२ । माझ्यावर आई भवानीचा आशीर्वाद आहे, त्यामुळे कितीही अफझलखान आले, तरी मी त्यांना भीत नाही. शेवटी आई भवानीवर माझा विश्वास असून, आपलाच विजय होईल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

याप्रसंगी उस्मानाबादहुन आलेल्या कार्यकर्त्यांसह आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत केलेल्या या वक्तव्यात “एक उत्तम सुरुवात झाली आहे, दसऱ्याला आपण पुन्हा भेटणार आहोत. सध्या न्यायालयात दुसरी केस सुरू आहे. सुप्रीम कोर्ट व आई भवानीवर आपला विश्वास असल्याने विजय आपलाच होणार, न्याय आपल्यालाच मिळणार” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी त्यांचा विश्वास व्यक्त केला.

“आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मी येणारच, मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचे आहे. कारण कैलासचा भीमपराक्रम व ओमराजेची मेहनतही सर्वांना माहिती आहे. जिथे लोकप्रतिनिधी घट्ट आहेत, तिथे शिवसेना मजबूत राहणारच. ज्यांना मोठ्या कष्टाने मोठे केले, ते खोक्यात गेले” असेही ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष, आमदारांची अपात्रता व खरी शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतांना उद्धव ठाकरेंनी ही बोचरी टीका केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम