मी कोणालाही घाबरत नाही ; पेडणेकरांचा सोमय्याना दिले उत्तर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ डिसेंबर २०२२ ।  राज्यातील ठाकरे व भाजपचे वाद आता पर्यत सुरूच आहेत. त्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किशोरी पेडणेकर यांनी SRA वरळी इथं राहतं असं सांगितलं.

मुंबई महापालिकेनं त्यांची चौकशी केली. त्यातून महापालिकेनं अहवाल दिला की, पेडणेकर यांनी घुसखोरी करून ताबा घेतला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना किशोरी पेडणेकर यांनी सडेतोड उत्तर दिलंय. पेडणेकर म्हणाल्या, घर असणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. कारण, नसताना गरिबांना त्रास दिला जातोय. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. ज्या घराचा माझा 11 महिन्यांपुरता संबंध असायचा, मग बाकीचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल त्यांनी केलाय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम