मी जातीचे राजकारण केले नाही ; शरद पवार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ नोव्हेबर २०२३

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कथित जातीचा दाखला सोशल मीडियावर मोठय प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर शरद पवारांनी ओबीसी जातीचा दाखल घेतल्याचा दावा करण्यात आला.

या प्रकरणी मोठे वादंग झाल्यानंतर शरद पवारांनी मंगळवारी स्वतः त्यावर भाष्य केले. मी सोशल मीडियावर व्हायरल झालेला दाखला पाहिला. माझी जात जगजाहीर आहे. कुणाचीही जात लपून राहू शकत नाही. मी आतापर्यंत केव्हाच जातीचे राजकारण केले नाही आणि करणारही नाही, असे शरद पवार आपल्या टिकाकारांना खडसावत म्हणाले.
शरद पवार व्हायरल दाखल्याविषयी बोलताना म्हणाले की, त्यातील काही गोष्टी खऱ्या आहेत. पण काही लोकांनी इंग्रजीचा दाखला फिरवला. त्यात माझ्या जातीच्या रकान्यात ओबीसी लिहिलेले आहे. ओबीसी वर्गाबद्दल मला प्रचंड आदर व आस्था आहे. पण जन्माने प्रत्येकाची जी जात असते तीच माझी आहे. कुणीही ती लपवू शकत नाही. साऱ्या जगाला माझी जात कोणती ते माहिती आहे.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, मी जातीच्या मुद्यावर केव्हाच समाजकारण व राजकारण केले नाही. करणारही नाही. पण त्या वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी जो हातभार लावणे गरजेचे आहे तो माझ्याकडून लावला जाईल. आज बारामती येथील गोविंद बागेत दिवाळी पाडवा साजरा करण्यात आला. यावेळी पवार पत्रकारांशी बोलत होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम