प्रसिद्ध अभिनेत्रीला पोलिसांनी केली अटक : कारण आले समोर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ नोव्हेबर २०२३

देशातील चित्रपट सृष्टीतून नेहमीच काहीना काही बातम्या समोर येत असतात, अशीच एक धक्कादायक बातमी सध्या उडिया सिनेसृष्टीतून समोर आली आहे. उडिया अभिनेत्री मौसमी नायकला पोलिसांनी दि. १३ नोव्हेंबर रोजी सोमवारी अटक करण्यात आले आहे. ओडिसा पोलिसांनी मौसमी नायकला एका तरुण महिला लेखिकेला ब्लॅकमेल केल्याबद्दल आणि तिची सार्वजनिक प्रतिमा खराब केल्यामुळे अटक केली आहे. इतकंच नाही तर, मौसमीने लेखिका बनस्मिता पतीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप सुद्धा केले आहे.

भुवनेश्वरमधील इन्फोसिटी पोलिसांनी लेखिकेच्या तक्रारीच्या आधारे अभिनेत्रीला अटक केली आहे, भुवनेश्वर पोलिस उपायुक्त (डीसीपी) कार्यालयाने असे एका निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौसमी नायकने याआधी लेखिका बनस्मिता पतीच्या विरोधात इन्फोसिटी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तिने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये, बनस्मिताने ५.८ लाख रुपये परत न केल्यामुळे तिने तक्रार दाखल केली होती. यावेळी दोघांमध्ये समन्वय झाले आणि त्यानंतर मौसमी नायकने आपली तक्रार मागे घेतली. बनस्मिताने मौसमी नायकला पैसेही परत केल्याची पोलिसांना माहिती दिली असून मौसमी बनस्मिताची प्रतिमा मलिन करणारे कोणतेही पाऊल उचलणार नाही, असे सुद्धा आश्वासन दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौसमी नायकला तिचे पैसे परत मिळाल्यानंतरही, तिने बनस्मिता पती आणि तिच्या कुटुंबियांविरोधात माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली होती. चांडका पोलिस ठाण्यात बनस्मिताच्या पतीविरुद्ध खोटा गुन्हाही दाखल केला. मौसमी नायकने लेखिका आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारे संदेशही पाठवले होते. चौकशीदरम्यान मौसमीने गुन्हा कबूल केला आहे. गुन्ह्याची कबुली केल्यानंतर मौसमीवर पोलिसांनी कलम ३८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यासोबतच कलम २९४, कलम ५०६ आणि ५०७ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम