संजय राऊतांनी दिली महत्वाची माहिती ; अजित पवार बंड…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ एप्रिल २०२३ ।  महाविकास आघाडीमधील महत्वाचा पक्ष मानला जाणारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार आपल्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राज्यभर सुरु झाल्या आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार का? आपल्यासोबत ते किती आमदारांना घेऊन जाणार?, हे दोनच प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात विचारले जात आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आज सकाळीच उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे या नेत्यांनी एकमेकांशी चर्चा केली. महाविकास आघाडी भक्कम आहे. माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार अजित पवार बंड करणार नाहीत. अजित पवारांबाबत येत असलेल्या बातम्या पूर्ण खोट्या आहेत. भाजपकडून या अफवा पसरवल्या जात आहे. 2024पर्यंत महाविकास आघाडी खिळखिळी करण्याचे भाजपचे हे प्रयत्न आहेत.

संजय राऊत म्हणाले, भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा पक्ष पूर्णपणे शरद पवारांशी बांधिल आहे. अजित पवारांबाबत ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्या म्हणजे अंतिम सत्य नाही. अजित पवार भाजपमध्ये जाणार, या बातम्या पूर्ण खोट्या आहेत. भाजपकडून या अफवा, वावड्या पसरवल्या जात आहेत. लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीत फूट पडणार नाही. अजित पवार हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत. त्यांचे राजकीय भविष्य मविआतूनच शिखरावर जाईल. भाजपकडून ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्याचा मविआच्या एकीवर काहीही परिणाम होणार नाही. अशा बातम्या येतात आणि जातात. लोक फक्त ते एन्जॉय करतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम