
पवारांची नाराजी व शिंदे गटाची केस ; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा !
दै. बातमीदार । १८ एप्रिल २०२३ । गेल्या आठदिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच अजित पवार भाजपसोबत जाणार या चर्चामुळे शिंदे गटालाही धक्का बसू शकतो. त्यातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी अजित पवारांबाबत बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार हे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून नाराज आहेत. मात्र अजित पवार यांची नाराजी आणि आमची सर्वोच्च न्यायालयातील केसचा काहीही संबंध नाही, असा दावाही शिरसाट यांनी केला आहे. यावेळी शिरसाट यांनी अनेक गौप्यस्फोट केले. ते म्हणाले की, नागपूर येथे आयोजित वज्रमुठ सभेत अजित पवार यांना बोलू दिलं नाही. १० मिनिट बोलू दिलं असतं तर काय झालं असतं. मात्र त्यांना बोलू दिलं नाही. तसेच धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांचेही फोन उचलत नव्हते, असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम