पवारांनी वातावरण तापवले ; शासकीय बंगला देवगिरी बंद !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ एप्रिल २०२३ ।  गेल्या आठदिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या प्रयत्नांना त्यांच्या पक्षातील आमदारांच्या संमती सह्या मिळाल्याने वेग आला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. अशाच मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांचा शासकीय बंगला देवगिरी बंद असल्याचे वृत्त समोर आले आहे.

शासकीय देवगिरी बंगल्यात,सकाळपासून अगदीच सामसूम आहे. आलेल्या अभ्यागतानाही 11 वाजता, विधिमंडळ कार्यालयात भेटतील हे सांगून रवाना केलं जातंय. कायम खुला असलेला, अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्याचा दरवाजा बंद असल्यानं राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.पोलिसांकडून बाहेर प्रतीक्षेत असलेल्या अभ्यागतांची नोंद घेतली जाते. पण अजित पवार देवगिरीवर कधी येणार हे मात्र कुणी सांगत नाही. अशी माहितीही समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. राष्ट्रवादीकडे सध्या स्थितीला 53 आमदार आहे. तर पक्षांतर बंदी कायद्याच्या नियमानुसार वेगळा गट स्थापन करण्यासाठी 36 आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहे. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम