अजित पवारांच्या बारामतीत आ.पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ सप्टेंबर २०२३ | राज्यात गेल्या आठ दिवसापासून भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुध्द विधान केल्याने आ.पडळकर यांच्याविरोधात बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले होते, आज बारामतीत त्याच भिगवण चौकात भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालत पडळकर यांचे समर्थन केले.

राज्यात भाजपसोबत राष्ट्रवादीमधील अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. गोपीचंद पडळकर यांनी मध्यंतरी धनगर आरक्षणाच्या विषयावरुन अजित पवार यांच्याविषयी काही विधान केले होते. या विधानाने राज्यात अजित पवार समर्थक संतप्त झाले होते. ठिकठिकाणी आंदोलन करुन या घटनेचा निषेध केला गेला. आज बारामतीत भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालत त्यांचे समर्थन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम