राज्यात पावसाचा हाहाकार : पाच गावांचा संपर्क तुटला !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ सप्टेंबर २०२३ | राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने अनेकांचे मोठे नुकसान तर काहीना दिलासा दिला आहे. पण यात हिंगोलीच्या अंभेरी परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अंभेरी ईसापुर गावालगत असलेल्या ओढ्याला पूर आल्याने पाच गावातील नऊ हजार नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे.

राज्यातील अनेक भागात मागील तीन- चार दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. बहुतांश ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जंजीवास विस्कळीत झाले आहे. या दरम्यान हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील पाच तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मध्यरात्री सुरू झालेल्या हा पाऊस सकाळपर्यंत सुरू असल्याने हिंगोली तालुक्यातील अनेक नद्या ओढे व नाल्यांना पूर आला आहे. हिंगोली तालुक्यातील अंभेरी ईसापुर गावालगत असलेल्या ओढ्याल मोठ्या प्रमाणात पाणी येऊन पूर आल्याने, पाच गावातील नऊ हजार नागरिकांचा हिंगोली शहराशी थेट संपर्क तुटला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून या गावातील नागरिक ओढ्याच्या पलीकडेच अडकून पडले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम