‘मोदी हटाओ देश बचाओ’ पोस्टर लावल्याप्रकरणी ; ६ अटकेत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ मार्च २०२३ ।  देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील काही भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्टर्स लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 100 फिर्यादी दाखल केल्या आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आलीये.

दिल्लीचे विशेष आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी ही माहिती दिली. सार्वजनिक मालमत्तांचं विद्रुपीकरण आणि छापखाना कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आलीये.
दिल्लीच्या विविध भागांत ‘मोदी हटाओ देश बचाओ’ असा मजकूर असलेली पोस्टर चिकटवण्यात आली आहेत. अशी जवळपास 2 हजार पोस्टर फाडण्यात आली, तर 2 हजार पोस्टर लावण्यापूर्वीच एका व्हॅनमधून ताब्यात घेण्यात आली आहेत. दिल्लीतील आप मुख्यालयाकडून एक गाडी आय.पी. इस्टेट भागात आली असता पोलिसांनी तिला अडवलं आणि तिच्या चालकाला अटक केली.

या गाडीत मोदींविरोधातील पोस्टर सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. चालकाच्या माहितीवरून पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केलीये. 2 मुद्रण कंपन्यांना प्रत्येकी 50 हजार पोस्टर छापण्याची ऑर्डर देण्यात आली होती. या कंपनीशी निगडीत कर्मचाऱ्यांना ही पोस्टर लावण्याचंही काम देण्यात आलं होतं, असंही पोलिसांनी सांगितलं.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम