कामाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा ; आजचे राशिभविष्य !

बातमी शेअर करा...

मेष : भागीदारी व्यवसायात खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. काही कारणास्तव जोडीदारांवर चिडचिड होईल. मात्र, सांभाळून घ्या.

वृषभ : आर्थिक लाभ होईल. ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. जीवनसाथीसोबत कुठे फिरायला जाऊ शकतात, या वेळात तुम्हा दोघांच्या मध्ये थोडे-फार वाद होऊ शकतात.

मिथुन : आर्थिक बचत करण्यात यशस्वी असाल. आज तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य. जोडीदारांसोबत बहारदार क्षण घालवाल.

कर्क : आर्थिक खर्च होऊ शकते. व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावूक होऊ शकतात.

सिंह : आर्थिक स्थिती सामान्य. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. वैवाहिक आयुष्यात सुसंवादाची आवश्यकता. कामाच्या ठिकाणी व्यस्त कामकाजामुळे तणाव येण्याची शक्यता.

कन्या : अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. जोडीदारासोबत संबंध तणावाचे बनतील. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. बऱ्याच काळापासून ते वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल.

तूळ : गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत केले तर आज नेहमीपेक्षा दुहेरी उत्पादन करू शकाल. जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.

वृश्चिक : गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाही. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल.

धनु : गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता. कल्पनाशक्ती व्यावसायिक यशशिखरे गाठण्यासाठी वापरायला हवी. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मकर : आर्थिक खर्च अधिक होतील. तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता. व्यावसायिक आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकतात. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. जोडीदारासोबत रुसवा-फुगवा होण्याची शक्यता.

कुंभ : आर्थिक योजना यशस्वी होईल. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत केलेत तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल. आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत वेळ घालवाल.

मीन : अनपेक्षित लाभ होतील. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम