भारताचा मोस्ट वाँटेड शाहिद लतिफची पाकिस्तानात हत्या !
बातमीदार | ११ ऑक्टोबर २०२३
भारताचा प्रख्यात गुन्हेगार व अतिरेकी शाहिद लतिफ यांची पाकिस्तानातील सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली असल्याचे वृत समोर आले आहे. शाहीदवर गोळ्या झाडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. एनआयएने शाहिदच्या विरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो पठानकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. भारताच्या मोस्ट वाँटेड अतिरेक्यांच्या यादीत त्याचा समावेश होता.
शाहिद लतिफ हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथील रहिवाशी होता. तो जैश ए मोहम्मद या अतिरेक्यांच्या संघटनेत होता. या अतिरेकी संघटनेचा तो सियालकोटचा कमांडर होता. भारतात अतिरेक्यांना पाठवण्यावर देखरेख करणं आणि दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यामध्ये तो सामील असायचा. शाहिदला 12 नोव्हेंबर 1994 रोजी अटक करण्यात आली होती. भारतातील तुरुंगात 16 वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर त्याला 2010 नंतर वाघा बॉर्डरवरून निर्वासित करण्यात आलं होतं. पंजाबच्या पठानकोटमध्ये 2 जानेवारी 2016मध्ये हल्ला झाला होता.
त्यामागचा मास्टरमाइंड शाहिदच होता. त्याशिवाय इंडियन एअरलाइन्सचं विमान हायजॅक करण्यातही तो सामील होता. पठानकोटच्या एअरबसवर 2016मध्ये हल्ला करण्यात आला होता. जैश ए मोहम्मदने हा हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात सात भारतीय जवान शहीद झाले होते. पठानकोट एअरफोर्स आपल्या सीमेजवळ आहे. या ठिकाणी भारताचे शस्त्रास्त्र असतात. युद्धाच्या काळात याच ठिकाणाहून संपूर्ण रणनीती ठरवली जाते. 1965 आणि 1971च्या युद्धात या एअर फोर्स स्टेशनने मोठी भूमिका बजावली होती. मिग-21 फायटेर जेटसाठी हे बेस स्टेशन आहे. शाहिद लतिफच्या आधीही पाकिस्तानात अनेक अतिरेक्यांची हत्या झालेली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम