तीन दिवसात सोन्याचे दर भिडले गगनाला !
दै. बातमीदार । २५ मार्च २०२३ । देशात सध्या प्रत्येक राज्यात मोठ्या प्रमाणात लग्नसराईचे दिवस सुरू झाले असतांना चैत्र नवरात्रही सुरू आहे. तर नुकताच गुढीपाडवा देखील होवून गेला आता अक्षय तृतीया तोंडावर आली आहे. या सगळ्यानिमित्ताने सोनं खरेदी होतच राहणार आहे.तर गेल्या तीन दिवसात सोन्याचे दर गगनाला भिडले आहे
गेल्या तीन दिवसांपासून सोन्याचे दर वाढले आहेत. एवढंच नाही तर आता चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर 69 वर पोहोचले आहेत. २४ कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी ६० हजार रुपये मोजावे लागत आहेत. शुक्रवारी 59,780 रुपये दर होता. आता २२० रुपयांनी सोनं वाढलं आहे. 24 कॅरेट 8 ग्रॅम सोन्यासाठी आज 48,000 रुपये मोजावे लागणार आहेत. शुक्रवारी हेच दर 47,824 रुपयांवर होते. यामध्ये 176 रुपयांनी वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचे दर 55,000 वर पोहोचले आहेत. तर 1 ग्रॅम सोन्यासाठी 5,500 रुपये मोजावे लागत आहेत.
भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस आकारून त्याची विक्री करतो.
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम