बातमीदार | १८ सप्टेंबर २०२३
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात सोन्या-चांदीचे दर घसरले होते तर तिसऱ्या आठवड्या पुन्हा दर वाढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम सराफ बाजारात पाहायला मिळाला. जाणून घेऊया आज १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावात दरात वाढ झाली आहे. तर चांदीत थोड्या प्रमाणात घटली आहे. मे-जून महिन्यात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळाली. ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात घट झाली होती.
गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार सकाळच्या सत्रानुसार शनिवारी १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५०५ रुपये तर २४ कॅरेटनुसार ६०,०४० रुपये मोजावे लागले तर आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५२० रुपये तर २४ कॅरेटनुसार ६०,२१० रुपये मोजावे लागणार आहे. अशातच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमच्या दरात १६० रुपयांनी वाढ झाली आहे. गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार शनिवारी सकाळच्या सत्रानुसार १० ग्रॅमसाठी ७४७ रुपये आज मोजावे लागणार आहे. तर आज १० ग्रॅमसाठी ७४५ रुपये मोजावे लागणार आहे. प्रतिकिलोनुसार आज चांदीच्या दरात २०० रुपयांनी घट झाली आहे.
गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा किंमत 60,050 आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर 60,050 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 60,080 रुपये मोजावे लागणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम