इंडिया आघाडीची थेट गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर !
बातमीदार | २० ऑगस्ट २०२३ | देशातील इंडिया आघाडीची बैठक येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये होत असून त्यापूर्वीच इंडिया आघाडीतील एका पक्षाच्या नेत्याने थेट गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर दिली आहे. कॅगच्या अहवालामध्ये गडकरींच्या खात्यावर ठपका ठेवण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरु झालेल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी गडकरींना संपवण्याचा दिल्लीतून कट रचला जात असल्याचं म्हटलं आहे. त्यांनीच गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर देऊ केलीय.
नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे दावेदार होतील म्हणून दिल्लीमधल्या नतद्रष्ट लोकांनी त्यांना संपवण्याचा कट रचला आहे. हा कट उधळून लावण्याचं काम महाराष्ट्र करेल. गडकरी यांना विनंती आहे की, त्यांनी मराठी माणसाचं पाणी दिल्लीकरांना दाखवून द्यावं.
राऊत पुढे म्हणाले की, नितीन गडकरींनी इंडिया आघाडीमध्ये यावं. आम्ही त्यांना पंतप्रधान केल्याशिवाय राहणार नाहीत. असा शब्द उद्धव ठाकरेसुद्धा देतीत. फक्त गडकरींनी दिल्लीकरांना घाबरु नये. रिपोर्टमध्ये सांगितलेले मुद्दे योग्य नाहीत. द्वारका एस्क्प्रेसवे २९ किलोमीटर अंतराचा असल्याचं सांगण्यात आलंय. आम्ही जी कॅबिनेट नोट पाठवली होती त्यात लिहिलं होतं की, आम्ही पाच हजार किलोमीटरचा टू लेन रोड बनवू आणि त्याची किंमत ९१ हजार कोटी रुपये असेल. यात फ्लायओव्हर आणि रिंगरोडची किंमत इस्टिमेटेड डीपीआर बनल्यानंतर ठरवण्याचा निर्णय झाला होता, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम