एनआयएनची मुंबईसह सहा राज्यात छापेमारी !
बातमीदार | ११ ऑक्टोबर २०२३
देशातील एनआयएने बुधवारी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली व तामिळनाडू या 6 राज्यांमध्ये छापेमारी केली. पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) च्या 12 ठिकाणी ही शोध मोहीम सुरू आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे पीएफआयवर गेल्या वर्षी बंदी घालण्यात आली होती.
राष्ट्रीय तपास एजन्सीने बुधवारी पीएफआय प्रकरणी मुंबईतील विक्रोळी भागात छापेमारी केली. हे पथक पहाटे 5 च्या सुमारास 7/11 रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपी वाहिद शेख याच्या घरी पोहोचले. पण शेख कुटुंबीयांनी घराचा दरवाजा काढण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे जवळपास 3 तास या पथकाला घराबाहेरच ताटकळत उभे रहावे लागले.
वाहिद शेखला 2007 च्या रेल्वे बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक करण्यात आली होती. पण 2015 मध्ये त्याची सबळ पुराव्याअभावी सुटका करण्यात आली होती. त्याचा पीएफआयशी संबंध असल्याचा संशय आहे. या संशयापोटी एनआयएचे पथक बुधवारी पहाटे अब्दुल वाहिद शेखच्या विक्रोळी स्थित घरी पोहोचले. पण वाहिदने घराचा दरवाजा उघडण्यास टाम निकार दिला. यामुळे एनआयएचा त्याच्याशी वाद झाला. या प्रकरणी शेख याने एनआयए अधिकाऱ्यांवर छापेमारीची नोटीस न दाखवण्याचा आरोप केला आहे. तो म्हणाला की, पोलिसांचे पथक छापेमारीसाठी बुधवारी पहाटे 5 च्या सुमारास माझ्या निवासस्थानी पोहोचले. मी त्यांना नोटीस दाखवण्याची विनंती केली. पण त्यांनी ती दाखवण्यास नकार दिला. यामुळे मी घराचे दार उघडले नाही. त्यानंतर त्यांनी घराचा मुख्य दरवाजा तोडला. त्याची मी पोलिस आयुक्तांकडे रितसर तक्रार केली आहे. स्थानिक पोलिसही येथे आहेत. त्या सर्वांनी माझ्या घराला घेराव घातला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम