मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ; संजय राऊतांची टीका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ ऑक्टोबर २०२३

राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन पेटले आहे तर राजकीय नेत्यांना देखील आंदोलनकर्त्यांनी गावबंदी केली असल्याने याचा फटका अनेक नेत्यांना बसला आहे पण सत्ताधारी नेते सध्या राज्याच्या राजकारणात काहीही बोलण्याची भूमिका घेत नसताना विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

खा.संजय राऊत म्हणाले कि, राज्यातील मराठा आरक्षणामुळे वातावरण पेटले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी छत्तीसगडला गेले आहेत. तसेच दुसरे एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मोक्याच्या क्षणी डेंग्यूची लागण झाली आहे, अशी टीका देखील त्यांनी मंगळवारी राज्य सरकारवर निशाणा साधताना केली आहे. शिंदे गटाचे खासदार मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजीनामा देण्याचे ढोंग करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. राज्यातील मराठा आरक्षणाचे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये जाळपोळीच्या घटना घडत आहेत. विशेषतः बीड व धाराशिवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी या प्रकरणी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, मराठा आरक्षण आंदोलन सरकारच्या हाताबाहेर गेले आहे. सत्ताधारी आमदार मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे देत आहेत. आमदारांचा राजीनामा पुरेसा नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच राजीनामा द्यायला हवा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम