
देशात पुन्हा एकदा नोटबंदीची तयारी सुरू आहे का?
बातमीदार | ८ सप्टेंबर २०२३ | ‘इंडिया की भारत’ या चर्चेला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कधीही न संपणारी चर्चा असे संबोधले. प्रकल्प भवन येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सायंकाळी उशिरा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर अनेक तिरकस बाण सोडले. ते कोणकोणत्या गोष्टींची नावे बदलणार आहेत हे त्यांनाच ठाऊक.
आता नोटांवर लिहिलेले नावही बदलणार का, की ही पुन्हा एकदा नोटबंदीची तयारी सुरू आहे, असा सवाल त्यांनी केला. देशाच्या नावावरून सुरू करण्यात आलेली चर्चा केवळ देशातच नव्हे तर जगभरात हास्यास्पद बनली आहे. आज टीव्ही चॅनेल्सवर वादविवाद सुरू आहेत, जे आपणही पाहात आहोत. अखेर, अशा निर्णयाचे काय परिणाम होतील हे येणारा काळच सांगेल. ज्या अपेक्षेने केंद्र सरकार निवडण्यात आले होते. त्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत, असे सोरेन म्हणाले.
केंद्र सरकारला इंडियाची भीती
इंडिया की भारत या मुद्द्यावरील चर्चेच्या बहाण्याने भाजपेतर पक्षांच्या नेत्यांना केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्याची संधी मिळाली आहे. हेमंत सोरेन सरकारमधील आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी विरोधकांच्या एकजुटीने केंद्रातील मोदी सरकार घाबरले असल्याचे म्हटले. ही भाजपची सुनियोजित खेळी आहे. मेक इन इंडिया म्हणणारे मेक इन भारत का म्हणत नव्हते ? असा सवाल त्यांनी केला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम