रस्त्यांवर पायी फिरणे अवघड होणार ; संजय राऊतांचा इशारा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ ऑक्टोबर २०२३

शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात पक्ष कुणाचा यावर निर्णय सुरु असतांना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले कि, शिवसेनेचे ४० व राष्ट्रवादी काँग्रेसचे तेवढेच आमदार आपापल्या मूळ घरांत चोरी करून पळून गेलेत. त्या चोरांना, दरोडेखोरांना विधानसभा अध्यक्ष सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण देत असतील, तर खुर्ची गेल्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या रस्त्यांवर पायी फिरणे अवघड होईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अपात्रतेची सुनावणी करण्यात जाणिवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, हे सरकार संविधानविरोधी व बेकायदा आहे. सरकार चोर व लफंगे चालवत आहेत. त्यांना घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती संरक्षण देत असेल तर या देशात व राज्यात काय सुरू आहे याची कल्पना न केलेली बरी. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यानंतर राहुल नार्वेकर उद्या जेव्हा ते खुर्चीवर नसतील तेव्हा त्यांना महाराष्ट्राच्या रस्त्यावर फिरणेही मुश्किल होईल. या राज्यातील जनता त्यांना माफ करणार नाही. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. ‘त्यांना’ (शिंदे गटाचे आमदार) फासावर लटकवण्याचे आदेश दिल्लीतून आलेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लोकशाहीच्या मारेकऱ्यांची उपमा दिली आहे. पण कोर्टाने त्यांच्या अपात्रतेचे काम विधिमंडळाच्या अध्यक्षांवर सोपवले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम