‘जय शंभू नारायण’ डॅडीचा ‘दगडी चाळ २’ टेलिव्हिजन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ ऑक्टोबर २०२२ । देशात गाजलेले प्रकरण म्हणजे मुंबईतील गॅंगवॉर आणि त्यातील डॅडी म्हणजेज ‘अरुण गुलाब गवळी’ हे सगळ्यांनाच माहित आहेत. कारण मुंबईवर राज्य केलेल्या डॅडींनी चाळीतल्या लोकांच्या मनावरही कायम राज्य केले आहे. बाहेरच्या लोकांसाठी ते कुख्यात गुंड किंवा डॉन होते मात्र चाळीतल्या लोकांसाठी ते नेहमीच देव राहिले आहेत.

अशा त्यांच्या दगडी चाळीवर चित्रपट आला आणि हिटसुद्धा झाला. मुख्य म्हणजे दगडी चाळनंतर १९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला दगडी चाळ २ देखील तुफान गाजला. यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा दगडी चाळ २ आता तुमच्या टीव्हीवर येतोय. होय. पुढच्या रविवारी या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.

 

 

आतापर्यंत प्रवाह पिक्चर वाहिनीने पावनखिंड, झिम्मा, चंद्रमुखी, कारखानिसांची वारी अश्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रेक्षकांच्या भेटीला आणले. यानंतर आता ‘दगडी चाळ २’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट हि वाहिनी घेऊन येते आहे. ‘दगडी चाळ २’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर अगदी भरभरुन प्रतिसाद दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम