देशभरात मिळणार नोकरी ; १८४ पदासाठी भरती !
बातमीदार | २१ ऑक्टोबर २०२३
राज्यातील अनेक तरुण तरुणी नोकरीसाठी अनेक मोठ मोठ्या शहरात धाव घ्यावी लागत आहे. जर तुम्ही देशातील कुठल्याही शहरात काम करण्यासाठी सज्ज असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची असेल. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
अर्ज करण्याची प्रक्रिया 20 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 184
रिक्त पदाचे नाव : इंजिनिअर ट्रेनी
पदांचा तपशील आणि रिक्त पदसंख्या :
ईलेक्ट्रिकल 144
सिव्हिल 28
इलेक्ट्रॉनिक्स 06
कॉम्प्युटर सायन्स 06
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/B.Sc (Engg.) (ii) GATE 2023
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 10 नोव्हेंबर 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
किती पगार मिळेल?
निवडलेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत रु.40,000/- -3%- 1,40,000 (IDA) वेतनश्रेणीत ठेवण्यात येईल. त्यांना मूळ वेतन रु. 40,000/- IDA,
HRA आणि लाभांसह प्रशिक्षण कालावधीत मूळ वेतनाच्या 12%.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर आणि नियमित झाल्यावर, उमेदवाराला E2 स्केलमध्ये अभियंता म्हणून सामावून घेतले जाईल – रु. 50,000/- 3%- 1,60,000/-
(IDA).
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.powergrid.in.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम