ठाकरे गटाच्या आमदाराला मुंबई पोलिसांचा समन्स !
बातमीदार | २१ ऑक्टोबर २०२३
राज्यातील ठाकरे गटाच्या नेत्यांसह आमदारांना गेल्या काही महिन्यापासून अडचणीचा सामना करीत असतांना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे आमदार अडचणीत आले आहे. त्यांना आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले असून त्यांची चौकशी देखील करण्यात येणार आहे.
ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना 500 कोटींच्या कथित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. चौकशीसाठी रवींद्र वायकर यांना 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबईतील पोलिस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, अद्याप आपल्याला मुंबई पोलिसांचे समन्स मिळाले नसून समन्स आल्यास चौकशीसाठी हजर राहील, असे रवींद्र वायकर यांनी सांगितले आहे.
मुंबईच्या जोगेश्वरी येथील महापालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी बेकायदेशीरपणे एक पंचतारांकित हॉटेल बांधले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. रवींद्र वायकर यांनी हे हॉटेल बांधण्यापूर्वी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटींचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम